भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये प्रोबेशनरी इंजिनियर पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली असून इच्छुक आणि पात्र उमेदवार १४ नोव्हेंबर २०२५ पर्यंत अर्ज करू शकतो. या नोकरीसाठी तुम्ही bel-india.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करावेत.
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमधील या नोकरीसाठी ३४० पदांसाठी भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी इंजिनियरिंग केलेले असावे. इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर, मेकॅनिकल इंजिनियर, कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रिकल इंजिनियर पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. सर्वाधिक पदे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर पदासाठी भरली जाणार आहे. एकूण १७५ पदांसाठी भरती होणार आहे.
प्रोबेशनरी इंजिनियर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी बी.ई/बीटेक/बीएससी इंजीनियरिंग ग्रेजुएट, इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन/मॅकेनिकल/कॉप्यूटर सायन्स, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजीनियरिंग एंड कंप्यूटर साइंस इंजीनियरिंग/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल एंड इलेक्ट्रोनिक्स पदवी प्राप्त केलेली असावी.या नोकरीबाबत सविस्तर माहिती अधिसूचनेत देण्यात आली आहे.
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमधील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा २५ वर्षे असावी. या नोकरीसाठी निवड झाल्यावर ४०,००० ते १,४०,००० रुपये पगार मिळणार आहे. या नोकरीसाठी तुमची निवड लेखी परीक्षा, इंटरव्ह्यू आणि कागदपत्रे पडताळणीद्वारे केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करताना तुम्हाला ११८० रुपये शुल्क भरावे लागणार आहे.















Discussion about this post