सातारा । देवदर्शनाला पोहचण्याआधीच काळाने भाविकांवर घाला घातला आहे. देवदर्शनाला चाललेली ओमनी कार झाडावर आदळली. यात चार प्रवाशांचा मृत्यू झाला तर चार जण गंभीर जखमी झाले. ही घटना सातारा जिल्ह्यातील सुर्याचीवाडी गावाजवळ घडली असून या घटनेतील जखमींना उपचारासाठी वडूज आणि सातारा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, साताऱ्याच्या खटाव तालुक्यातील सिद्धेश्वर कुरोली येथील पांडूरंग देशमुख यांच्या मारुती ओमनी गाडीतून कुरोली व बनपुरी येथील काही भाविक लोकरेवाडी येथे श्री संत बाळूमामांच्या दर्शनाला जात होते.
यावेळी खटाव ते मायणी सुर्याचीवाडीजवळ चालकाचा ताबा सुटल्याने ओम्नी गाडी झाडावर आदळून भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत तिघांचा जागीच तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर अपघातात पाच जण जखमी झाले आहेत. जखमींवर सध्या उपचार सुरू असून जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.मृतांमध्ये एक पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Discussion about this post