बीड । एकीकडे संतोष देशमुख हत्याप्रकरणाने राज्याला हादरवून सोडले असून बीडमधील वाढत्या गुन्हेगारी घटनांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्था तसेच प्रशासनाची कार्यक्षमता आणि निर्णयक्षमतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे.यातच एक धक्कादायक प्रकरण समोर आले. आपल्या ट्रकवर चालक म्हणून नोकरी करणाऱ्या तरुणाने आपल्याच मुलीशी प्रेमसंबंध ठेवल्याचा कारणामुळे ट्र्क मालकाने तरुणाला २ दिवस झाडाला बांधून त्याला अमानुष मारहाण केली. त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी ६ जणांना अटक केली असून, ४ जण फरार आहेत. आरोपींच्या शोधासाठी २ पोलीस पथके रवाना झाल्या आहेत.
विकास बनसोडे हा २३ वर्षीय तरूण मुळचा जालना जिल्ह्यातील होता. कामानिमित्त तो बीडमध्ये आला होता. आष्टीतील पिंपरी येथील भाऊसाहेब क्षीरसागर यांच्याकडे तो ट्रक चालक म्हणून कार्यरत होता. दरम्यान त्याचं क्षीरसागर यांच्या मुलीसोबत प्रेमसंबंध जुळले. याची माहिती क्षीरसागर यांना मिळाल्यानंतर त्यांनी आणि त्याच्या कुटुंबाने मिळून विकासला मारहाण केली. ज्यात विकासचा मृत्यू झाला.
विकासचा भाऊ आकाशनं यासंदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. आकाशनं दाखल केलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी १० जणांविरोधात गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी ६ आरोपींना ताब्यात घेतलंय.
भाऊसाहेब भानुदास क्षीरसागर, बाबासाहेब भानुदास क्षीरसागर, स्वाती भानुदास क्षीरसागर, सुवर्णा बाबासाहेब क्षीरसागर, संकेत भाऊसाहेब क्षीरसागर , संभाजी झांबरे, सचिन भवर, भाऊसाहेब क्षीरसागर, सुशांत शिंदे, बापूराव शिंदे. अशी आरोपींची नावे आहेत.तर यापैकी संभाजी झांबरे सचिन भवर, बाबासाहेब क्षीरसागर, बाबुराव शिंदे फरार आहे. इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके रवाना केली आहेत.
Discussion about this post