प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनानंतर टाटा ट्रस्टची कमान कोणाच्या हाती असेल? याबाबत चर्चा सुरु होती. अखेर या मुद्द्यावरचा सस्पेन्स संपला आहे. आज टाटा समूहाच्या नव्या अध्यक्षांची घोषणा करण्यात आली आहे. टाटा समूहाचे नवे अध्यक्ष म्हणून नोएल टाटा यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
मुंबईमध्ये टाटा समूहाच्या झालेल्या बैठकीमध्ये हा सर्वात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे ते आता 100 देशांमध्ये पसरलेल्या टाटा समूहाच्या प्रचंड व्यापार साम्राज्याचे नेतृत्व करतील, ज्याची किंमत $403 अब्ज म्हणजेच 39 लाख कोटी रुपये आहे. नोएल टाटा हे रतन टाटा यांचे सावत्र भाऊ आहेत. ट्रस्टच्या कामकाजासाठी ते प्रमुख व्यक्तींपैकी एक मानले जात होते. रतन टाटा यांच्यानंतर आता नोएल टाटा ट्रस्टच्या होल्डिंग कंपन्या चालवतील. नोएल टाटा हे रतन टाटा यांचे वडील नवल टाटा आणि सायमन टाटा यांचे चिरंजीव आहेत.
कोण आहेत नोएल टाटा?
नोएल टाटा यांनी ससेक्स युनिव्हर्सिटी, यूके आणि INSEAD येथे आंतरराष्ट्रीय कार्यकारी कार्यक्रम (IEP) मध्ये शिक्षण घेतले आहे. ते त्यांच्या धोरणात्मक बांधणीसाठी आणि समूहाच्या दृष्टीकोनाशी बांधिलकीसाठी ओळखले जातात. नोएल टाटा यांची सर दोराबजी टाटा ट्रस्टचे 11 वे अध्यक्ष आणि सर रतन टाटा ट्रस्टचे 6 वे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे.टाटा ट्रस्टमध्ये ट्रस्टी म्हणून नोएल यांचाही सहभाग होता.
गेल्या काही वर्षांपासून ते टाटा इंटरनॅशनल लिमिटेडचे अध्यक्षही आहेत. त्यांचा टाटा समूहाचा चार दशकांचा मोठा इतिहास आहे. ते ट्रेंट, व्होल्टास आणि टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन या कंपन्यांचे अध्यक्ष आहेत. एवढेच नाही तर ते टाटा स्टील आणि टायटन कंपनी लिमिटेडचे उपाध्यक्ष म्हणून काम करतात. याशिवाय त्यांचे टाटा इकोसिस्टमशीही सखोल संबंध आहेत.















Discussion about this post