भारत डायनॅमिक्स लिमिटेड (BDL) ने 361 जागांसाठी भरती काढली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. या भरतीसाठी उमेदवार अधिकृत वेबसाइट bdl-india.in वर जाऊन अर्ज करू शकतात. हे लक्षात घेण्यासारखे आहे की अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 14 फेब्रुवारी आहे, त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरून विहित वेळेत सबमिट करावा.
रिक्त पदांचे तपशील :
या भरती मोहिमेचे उद्दिष्ट विविध युनिट्स आणि विभागांमधील एकूण ३६१ रिक्त पदे भरणे आहे. यामध्ये प्रकल्प अभियंता (Project Engineer), प्रकल्प अधिकारी (Project Officer), प्रकल्प पदविका सहाय्यक (Project Diploma Assistant), प्रकल्प व्यापार सहाय्यक (Project Trade Assistant), प्रकल्प सहाय्यक (Project Assistant) आणि प्रकल्प कार्यालय सहाय्यक (Project Officer Assistant) या पदांचा समावेश आहे.
आवश्यक पात्रता:
बीडीएल भरती २०२४ साठी अर्ज करणार्या उमेदवारचे BE / B.Tech / B.Sc अभियांत्रिकी / M.E. / M.Tech किंवा मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातील समतुल्य शिक्षण झालेले असणे आवशयका आहे. यासोबतच कामाचा अनुभव असावा.
पगार : 30,000, रु. 25,000, रु. 23,000 इतका असेल.
अर्ज शुल्क :
प्रकल्प अभियंता / प्रकल्प अधिकारी यांच्या अर्जाची फी ३०० रुपये निश्चित करण्यात आली आहे.
तर, प्रोजेक्ट डिप्लोमा असिस्टंट / प्रोजेक्ट ट्रेड असिस्टंट / प्रोजेक्ट असिस्टंट / प्रोजेक्ट ऑफिस असिस्टंटसाठी २०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे.
असा करा अर्ज
BDI भर्ती 2024 साठी अर्ज करण्यासाठी उमेदवार खालील चरणांचे अनुसरण करू शकतात:
BDI च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या, bdI-india.in.
होमपेजवर दिसणाऱ्या ‘अर्ज फॉर्म (अर्ज)’ वर क्लिक करा.
सर्व आवश्यक माहिती देऊन फॉर्म भरा.
सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि अर्ज फी भरा.
अर्ज सबमिट करा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआउट घ्या.
Discussion about this post