तुम्हीही नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी. भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटरमध्ये विविध पदांच्या एकूण २२ रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.
भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटरमध्ये इंटेन्सिव्हिस्ट, जनरल फिजिशियन, नेत्ररोगतज्ज्ञ, गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजिस्ट, नवजात रोग स्पेशलिस्ट, रेडिओलॉजिस्ट, पॅथॉलॉजिस्त टेक्नोलॉजिस्ट, फिजिओथेरेपिस्ट पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून MD/DNB किंवा PGDMLT/DMLT/ फिजिओथेरेपी पदवी प्राप्त केलेली असावी. ()
या नोकरीसाठी तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. मा. जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद धाराशिव येथे तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे.या नोकरीसाठी मुलाखत १७,१८ डिसेंबर रोजी होणार आहे. याबाबत सर्व माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटरमधील या नोकरीसाठी तुम्हाला २२,००० ते ९१,००० रुपये पगार मिळणार आहे.
Discussion about this post