नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी चालून आली आहे. भाभा अणु संशोधन केंद्र कार्मिक विभाग, ट्रॉम्बे, मुंबई येथे भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच ही मोठी संधी म्हणावी लागेल.
विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया तब्बल 50 पदांसाठी पार पडत आहे. या भरती प्रक्रियेसाठी वयाची अटही लागू करण्यात आलीये. 65 वयोगटापर्यंतचे उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. ही भरती प्रक्रिया चालक पदांसाठी होत आहे.या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 24 मे 2024 आहे. इच्छुकांना त्यापूर्वीच भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची अट लागू करण्यात आलीये. हेवी मोटार व्हेईकल आणि लाईट मोटार व्हेईकल वाहनांचे वैध लायसन्स असणे उमेदवारांकडे आवश्यक आहे. https://www.barc.gov.in/ या लिंकवर आपल्याला भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही मिळेल. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑफलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागतील.
https://www.barc.gov.in/careers/vacancy8.pdf या लिंकवर आपल्याला भरती प्रक्रियेची अधिसूचना ही वाचायला मिळेल. तसेच भरती प्रक्रियेसाठी करण्याचा अर्ज देखील अधिसूचनेच्या लिंकवर मिळेल. भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर उमेदवारांनी अधिसूचना ही व्यवस्थित वाचून घ्यावी आणि मगच भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा.















Discussion about this post