तुम्हालाही सरकारी बँकेत नोकरी करायची असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी. बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये भरती निघाली आहे. अहिल्यानगर येथील ब्रँचमध्ये ही भरती केली जाणार आहे.या नोकरीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहे. त्यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.
बँकेत वसुली एजंट, सरफेसी एन्फोर्टमेंट एजंट, जप्ती एजंट, डिटेक्टिव्ह इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी, सुरक्षा एजन्सी या पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.या नोकरीसाठी तुम्हाला १९ एप्रिलपर्यंत अर्ज करायचा आहे. तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे.
बँक ऑफ महाराष्ट्रमधील या नोकरीसाठी अर्ज तुम्हाला बँक ऑफ महाराष्ट्र, अंचल कार्यालय, अहिल्यानगर, गुरुकुल, लालटाकी रोड, अप्पू चौक, अहिल्यानगर ४१४००३ येथे अर्ज पाठवायचा आहे. बँकेत काम करण्याची ही उत्तम संधी आहे. सोबतच जे तरुण अहिल्यानगर येथे राहतात त्यांच्यासाठी ही उत्तम संधी आहे.
डीआरडीओमध्ये भरती
सध्या डीआरडीओमध्ये भरती सुरु आहे. डीआरडीओमध्ये १५० अप्रेंटिस पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. इंजिनियरिंग, नॉन इंजिनियरिंग, आयटीआय पदवीधरांसाठी नोकरी करण्याची ही उत्तम संधी आहे. चांगल्या सरकारी कंपनीत नोकरीची ही संधी आहे. या नोकरीतून तुम्हाला खूप काही शिकायला मिळणार आहे. याचा तुम्हाला पुढे भविष्यात खूप फायदा होईल.
Discussion about this post