बँकेत नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी महत्वाची बातमी आहे. बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये स्केल II, III, IV, V, VI आणि VII अंतर्गत स्पेशलिस्ट ऑफिसर पदासाठी भरती होत आहे.
या नोकरीसाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. तुम्ही bankofmaharashtra.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. ()
बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये १७२ पदांसाठी भरती सुरु आहे. बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये जनरल मॅनेजर, डेप्युटी जनरल मॅनेजर, असिस्टंट जनरल मॅनेजर, सिनियर मॅनेजर या पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ फेब्रुवारी २०२५ आहे.
बँक ऑफ महाराष्ट्रमधील वेगवेगळ्या विभागांमध्ये ही भरती केली जाणार आहे. त्यामुळे वेगवेगळ्या क्षेत्रात पदवीधर उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. त्यासाठी तुम्ही अधिकृत नोटिफिकेशन चेक करा.
या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २२ ते ५५ वर्षे असणे गरजेचे आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. इंटरव्ह्यूमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांटी निवड केली जाणार आहे. या नोकरीसाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी एकदा अधिकृत नोटिफिकेशन वाचा. (Bank of Maharashtra Job)
वेतन किती मिळेल?
या नोकरीसाठी स्केल II पदासाठी ६४८२० ते ९३९६० रुपये पगार मिळणार आहे. स्केल III पदासाठी 85920- 105280 पगार मिळणार आहे. स्केल IV पदासाठी 102300- 120940 पगार मिळणार आहे. स्केल VII साठी 156500- 173860 पगार मिळणार आहे.
Discussion about this post