बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये भरती जाहीर केली आहे. तुम्हीही बँकेतील नोकरीसीठी तयारी करत असाल तर ही उत्तम संधी तुमच्यासाठी आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले जात आहे.
जनरलिस्ट ऑफिसर स्केल II या पदासाठी ही भरती होणार आहे. या भरतीद्वारे तब्बल ५०० रिक्त पदे भरली जाणार आहे. या नोकरीसाठी तुम्ही अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. bankofmaharashtra.in वेबसाइटवर सर्व माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार तुम्ही अर्ज करावेत.
बँकेतील या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० ऑगस्ट २०२५ आहे. त्यामुळे इच्छुकांनी मुदतीपूर्वी अर्ज करावेत. अर्ज करण्यापूर्वी तुम्ही अधिसूचना वाचावी. त्यानंतर अर्ज करावेत.
आवश्यक पात्रता
बँक ऑफ महाराष्ट्रमधील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा २२ ते ३५वर्षे असावी. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेली असावी. याचसोबत चार्टर्ड अकाउंटंटदेखील अर्ज करु शकतात.
| जाहिरात (PDF) | Click Here |
| Online अर्ज | Apply Online |
पगार
बँक ऑफ महाराष्ट्रमधील या नोकरीसाठी निवड झाल्यावर तुम्हाला ९३,९६० रुपये पगार मिळणार आहे. त्यामुळे चांगल्या सरकारी बँकेत नोकरी करण्याची ही उत्तम संधी आहे.या नोकरीसाठी अर्ज करताना तुम्हाला ११८० रुपये शुल्क भरायचे आहे. तसेच राखीव प्रवर्गातील उमेदवारांना ११८ रुपये शुल्क भरायचे आहे.















Discussion about this post