बँकेत नोकरी मिळवण्यासाठी अनेकजण सरकारी परीक्षांची तयारी करत असतात. दरम्यान, तुम्हालाही जर सरकारी बँकेत नोकरी करायची असेल तर ही बातमी तुमच्यासाठी. बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांसाठी नवीन भरती जाहीर झाली आहे. यामध्ये चीफ मॅनेजर, सीनियर मॅनेजर, लॉ ऑफिसर, मॅनेजर अशा विविध पदांसाठी ही भरती जाहीर केली आहे. याबाबत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी bankofindia.bank.in च्या वेबसाइटवर जाऊन अर्ज करावेत. १७ नोव्हेंबरपासून तुम्ही अर्ज करायचे आहेत.
बँक ऑफ इंडियामध्ये स्पेशलिस्ट ऑफिसर पदांसाठी भरती जाहीर केली आहे. यामध्ये आयटी, प्रोजेक्ट मॅनेजर, डेटा सायंटिस्ट, एआय डेव्हलपर, लॉ ऑफिसर्स, मॅनेजर सिविल इंजिनियर, इलेक्ट्रिकल इंजिनियर पदासाठी भरती जाहीर केली आहे. एकूण ११५ पदांसाठी ही भरती केली जाणार आहे.
बँक ऑफ इंडियामधील या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया १७ नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०२५ आहे. २३ ते ४५ वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि इंटरव्ह्यूद्वारे केली जाणार आहे.
पात्रता
बँक ऑफ इंडियामधील नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी बी.ई/बीटेक कंप्यूटर साइंस/इनफॉर्मेशन टेक्नोलॉजी/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स कम्यूनिकेशन किंवा एमसीए/एमएससी/कंप्यूटर साइंस/आईटीमध्ये पदवी प्राप्त केलेली असावी. याचसोबत त्यांच्याकडे Oracle सर्टिफिकेट असावे.याचसोबत अनुभवदेखील विचारात घेतला जाणार आहे.
पगार
बँक ऑफ इंडिया ही सरकारी बँक आहे. सरकारी बँकेतील या नोकरीसाठी तुम्हाला ६४८२० ते १२०९४० रुपये पगार मिळणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि इंटरव्ह्यूद्वारे होणार आहे.















Discussion about this post