बँक ऑफ इंडियामध्ये भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे. ऑफिसर पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. बँक ऑफ इंडियामधील या नोकरीसाठी तुम्ही bankofinfia.co.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे.
बँक ऑफ इंडियामधील नोकरीसाठी अर्ज करण्याची सुरुवात ८ मार्च २०२५ पासून झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ मार्च २०२५ आहे. या भरतीमध्ये बँक ऑफ इंडिया चीफ मॅनेजर, सीनियर मॅनेजर, मॅनेजर पदे भरती केली जाणार आहे. एकूण १५९ रिक्त पदांसाठी ही भरती केली जाणार आहे.
बँक ऑफ इंडियामधील चीफ मॅनेजर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा २८ ते ४५ वर्षे असावी. सीनियर मॅनेजर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा २८ ते ४० वर्षे असावी. मॅनेजर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा २५ ते ३५ वर्षे असावी.
बँक ऑफ इंडियामधील मॅनेजर पदासाठी अर्ज करणाऱ्या सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना ८५० रुपये शुल्क भरायचे आहे. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना १७५ रुपये शुल्क भरावे लागणार आहे. तुम्ही ऑनलाइन पद्धतीने हे शुल्क भरु शकतात.
बँक ऑफ इंडियामधील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड ऑनलाइन टेस्ट किंवा इंटरव्ह्यूद्वारे केली जाणार आहे.ही परीक्षा इंग्रजी किंवा हिंदी भाषेत होण्याचा पर्याय असेल. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.
Discussion about this post