सरकारी बँकेत चांगली नोकरी करण्याची उत्तम संधी तरुणांकडे आहे. बँक ऑफ बडोदामध्ये तब्बल २५०० पदांसाठी ही भरती केली जाणार आहे.लोकल बँक ऑफिर पदांसाठी ही भरती होणार असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया ४ जुलैपासून सुरु झाली आहे. या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइनन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ही भरती आयबीपीएसद्वारे केली जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला ibpsonline.ibps.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे.
ही भरती रेग्युलर बेसवर केली जाणार आहे. वेगवेगळ्या राज्यांमध्ये ही भरती होणार आहे. महाराष्ट्रात ४८५ रिक्त पदांसाठी भरती करण्यात येणार आहे.गुजरातमध्ये ११६० रिक्त पदांवर भरती केली जाणार आहे.
पात्रता (Eligibility)
बँक ऑफ बडोदामधील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात ग्रॅज्युएशन पूर्ण केलेले असावे. इंटीग्रेटेड ड्युअल डिग्रीप्राप्त उमेदवारदेखील अर्ज करु शकतात. ज्या उमेदवारांकडे चार्टर्ड अकाउंट्ट, कॉस्ट अकाउंटंट, इंजिनियरिंग किंवा मेडिकल विषयात पदवी प्राप्त केलेली असेल ते उमेदवारदेखील अर्ज करु शकतात.
या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे १ वर्षाचा कामाचा अनुभव असावा. उमेदवाराने कमर्शियल बँक, रिजनल रुरल बँक, को-ऑपरेटिव्ह बँकेत काम केलेले असावे. उमेदवाराला स्थानिक भाषेचे ज्ञान असावी.या नोकरीबीबत अधिकृत वेबसाइटवर माहिती देण्यात आली आहे.
पगार
या नोकरीसाठी २१ ते ३० वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात.लोकल बँक ऑफिसर पदासाठी निवड झाल्यावर ४८,४८० ते ८५,९२० रुपये पगार मिळणार आहे.
निवड प्रक्रिया
या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, ग्रुप डिस्कशन आणि मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना ८५० रुपये फी भरावी लागणार आहे.















Discussion about this post