बँक ऑफ बडोदा संस्थापित स्वरोजगार विकास संस्थेमध्ये सध्या भरती सुरु आहे. याद्वारे ७वी आणि १०वी पास तरुणांना नोकरी करण्याची संधी मिळणार आहे. या नोकरीसाबाबत जाहिरात बँक ऑफ बडोदा स्वरोजगार विकास संस्थाद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना वाचा.
बडोदा स्वरोजगार विकास संस्थानमध्ये ऑफिस अटेण्डर, वॉचमन आणि गार्डनर पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. ७वी आणि १०वी पास तरुणांसाठी नोकरीचा ही उत्तम संधी आहे.
ऑफिसर अटेण्डर पदासाठी १४००० रुपये पगार मिळणार आहे. वॉचमन/गार्डनर पदासाठी १२००० रुपये पगार मिळणार आहे. या नोकरीसाठी तुम्ही ऑफलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात.
बँक ऑफ बडोदामधील या नोकरीसाठी २२ ते ४० वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकता. ही भरती कंत्राटी स्वरुपाची असणार आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया २० ऑगस्ट २०२५ पासून सुरु झाली आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ सप्टेंबर २०२५ असणार आहे.
या नोकरीसाठीचे ठिकाण थेऊर, पुणे असणार आहे. त्यामुळे तुमची निवड झाल्यास तुम्हाला थेऊरला जावे लागणार आहे. ऑफिस अटेण्डर आणि गार्डनर पदांसाठी भरती होणार आहे.
या नोकरीसाठी तुम्हाला अर्ज, बायोडेटा आणि शैक्षणिक कागदपत्रांची कॉपी ऑफलाइन पद्धतीने पाठवायचा आहे.तुम्हाला बडोदा स्वरोजगार विकास संस्थान, थेऊर फाटा-पुणे सोलापूर हायवे, पो. कुंजीरवाडी, ता. हवेली, जिल्हा पुणे- ४१२२०१ येथे पाठवायचा आहे.जर तुमचे ७वी पर्यंतचे शिक्षण झाले असेल तर तुम्ही ही नोकरी करु शकतात. या नोकरीतून तुम्हाला चांगला पगारदेखील मिळणार आहे. या नोकरीसाठी तुमची निवड झाल्यानंतर तुम्हाला कामाबद्दल माहिती दिली जाईल याचसोबत कामाचे तास सांगितले जातील.















Discussion about this post