सरकारी बँकेत नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी एक उत्तम संधी निर्माण झाली आहे. बँक ऑफ बडोदा (BOB) ने २,७०० अप्रेंटिस पदांसाठी भरती जारी केली आहे. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया ११ नोव्हेंबर २०२५ पासून सुरू झाली आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख १ डिसेंबर २०२५ आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट bankofbaroda.bank.in ला भेट देऊन अंतिम मुदतीपूर्वी पदांसाठी अर्ज करू शकतात.
बँक ऑफ बडोदातील या नोकरीसाठी २० ते २८ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी ट्रेनिंगचा कालावधी हा १२ महिन्यांचा असणार आहे. या नोकरीसाठी निवड झाल्यावर तुम्हाला दर महिन्याला १५००० रुपये पगार मिळणार आहे.
बँक ऑफ बडोदामधील नोकरीसाठी उमेदवारांची निवड ऑनलाइन परीक्षा, कागदपत्र पडताळणी आणि लोकल लँग्वेज टेस्टद्वारे होणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्यापूर्वी तुम्हाला www.apprenticeshipindia.gov.in किंवा nats.education.gov.in या वेबसाइटवर रजिस्ट्रेशन करायचे आहे.
पात्रता
या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेली असावी. २८ पेक्षा जास्त वयोगटातील उमेदवारांना अर्ज करता येणार नाही. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.
अर्ज शुल्क
अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी त्यांच्या श्रेणीनुसार विहित अर्ज शुल्क ऑनलाइन भरावे लागेल, त्यानंतरच त्यांचा अर्ज स्वीकारला जाईल. हे शुल्क खालीलप्रमाणे आहे:
सामान्य/ईडब्ल्यूएस/ओबीसी – ₹८००
पीडब्ल्यूबीडी – ₹४००
एससी/एसटी – मोफत















Discussion about this post