दहावी पास तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. दहावी पास तरुणांना सरकारी बँकेत नोकरी मिळणार आहे. बँक ऑफ बडोदाने सध्या भरती जाहीर केली आहे. या नोकरीसाठी उमेदवाराने फक्त १०वी पास असणे गरजेचे आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.
बँक ऑफ बडोदामधील या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ मे २०२५ आहे. त्यामुळे शेवटचे ३ दिवस उरले आहेत. इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. बँक ऑफ बडोदामध्ये शिपाई पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी तुम्ही bankofbaroda.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात.
बँक ऑफ बडोदातील या भरती मोहिमेत ५०० पदे भरती केली जाणार आहे. यामधील २५२ पदे सामान्य प्रवर्गासाठी राखीव आहेत. इतर पदे राखीव प्रवर्गासाठी आहेत.
बँक ऑफ बडोदामधील शिपाई पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून १०वी पास असणे गरजेचे आहे. याचसोबत संबंधित राज्यातील स्थानिक भाषा त्यांना येणे गरजेचे आहे. उमेदवाराला त्या भाषेत लिहता, वाचता आणि बोलता येणे गरजेचे आहे.
बँकेतील या नोकरीसाठी १८ ते २६ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना ६०० रुपये शुल्क द्यावे लागणार आहे. तसेच राखीव प्रवर्गातील उमेदवारांना १०० रुपये शुल्क द्यावे लागणार आहे.
अर्ज कसा करावा? (How To Apply)
या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी www.bankofbaroda.in/Careers.htm या वेबसाइटवर जायचे आहे.
यानंतर ‘Current Opportunities वर क्लिक करायचे.
यानंतर अप्लाय वर क्लिक करा.
यानंतर फॉर्म भरुन अर्ज सबमिट करावेत.
बँक ऑफ बडोदामधील या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि स्थानिक भाषा परीक्षेद्वारे होणार आहे. या परीक्षेत २५-२५ प्रश्न विचारले जाणार आहेत. यात पास झाल्यावर तुमची निवड केली जाणार आहे.
Discussion about this post