बँकेत नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. ती म्हणजे बँक ऑफ बडोदामध्ये सध्या नोकरीची सुवर्णसंधी आहे. बँक ऑफ बडोदामध्ये बीसी सुपरवाइजर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रियादेखील सुरु झाली आहे.
या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २१ ते ४५ वर्ष असावे. जर तुम्ही सेवानिवृत्त बँक कर्मचारी असाल तर तुम्हाला वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा ६५ वर्ष असावी.
बीसी सुपरवायजर पदासाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना इंटरव्ह्यूसाठी बोलावले जाणार आहे. उमेदवारांच्या परफॉर्मन्सच्या आधारे निवड केली जाणार आहे.
या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ ऑक्टोबर २०२४ आहे. या नोकरीबाबत सर्व माहिती bankofbaroda.in या वेबसाइटवर देण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना आपला अर्ज द रिजनल मॅनेजर, बँक ऑफ बडोदा, सबरकांता रिजनल ऑफिस, दुसरा मजला परफेक्त अॅव्हेन्यु, शमलाजी हायवे रोड, हिम्मतनगर-३८३००१ येथे अर्ज पाठवायचा आहे.
EXIM बँकेत भरती
बँकेत नोकरी करायची असेल तर सध्या EXIM बँकेतदेखील भरती सुरु आहे.EXIM बँकेत ऑफिसर पदासाठी भरती सुरु आहे. एक्झिम बँकेत ऑफिसर पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ ऑक्टोबर २०२४ आहे.
Discussion about this post