नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. देशातील आघाडीची सरकारी बँक असलेल्या Bank of Baroda मध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ग्रुप हेड, टेरिटरी हेड आणि डेप्युटी मॅनेजर या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.
या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया २७ मार्चपासून सुरू झाली असून इच्छुक उमेदवारांना १६ एप्रिलपर्यंत अर्ज करण्याची संधी उपलब्ध आहे. त्यामुळे सरकारी बँकेत करिअर करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांनी ही संधी दवडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेली असावी. यासोबतच मॅनेजमेंटमध्ये डिग्री किंवा डिप्लोमा असणे आवश्यक आहे. उमेदवारांचे वय पदानुसार २४ ते ४५ वर्षे दरम्यान असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना शासनाच्या नियमानुसार वयोमर्यादेत सवलत देण्यात येणार आहे.
अर्ज शुल्क
सामान्य प्रवर्ग: ८५० रुपये
राखीव प्रवर्ग: १७५ रुपये
ही भरती प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने होणार असून अर्ज कसा करायचा, आवश्यक कागदपत्रे आणि निवड प्रक्रिया याबाबत सविस्तर माहिती अधिकृत अधिसूचनेत देण्यात येणार आहे.
सरकारी बँकेत काम करण्याची ही संधी करिअरच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे. स्थिर नोकरी, चांगला पगार आणि भविष्यातील प्रगतीच्या संधी लक्षात घेता अनेक तरुणांसाठी ही भरती आकर्षक ठरण्याची शक्यता आहे. इच्छुक उमेदवारांनी वेळेत अर्ज करून या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा.















Discussion about this post