बँकेत काम करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. बँक ऑफ बडोदामध्ये विविध पदांसाठी भरती सुरु आहे. या नोकरीसाठी ७ वी, १० वी आणि १२वी पास उमेदवार अर्ज करु शकतात. बँक ऑफ बडोदामध्ये BSVS केंद्रासाठी वॉचमन आणि गार्डनर पदासाठी भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.
बँक ऑफ बडोदामध्ये वॉचमन आणि गार्डनर पदे भरण्यात येणार आहे. या नोकरीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहे. या नोकरीसाठी ६ हजार रुपये मासिक वेतन आणि ५०० रुपये प्रवास भत्ता दिला दाणार आहे.
सवाई माधवपूर येथील ब्रँचमध्ये ही पदे भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची सामान्य ज्ञान आणि संगणक क्षमतेचे मुल्यांकन करण्यासाठी लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. या नोकरीसाठी तुम्ही तुमचा अर्ज आणि त्यावर स्वाक्षरी करुन हार्ड कॉपी ऑफलाइन पद्धतीने पाठवायची आहे. ८ ऑगस्ट २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. बँक ऑफ बडोदा, रिजनल ऑफिस, सवाई माधवपूर, रणथंबोर रोड येथे हा अर्ज पाठवायचा आहे.
बँक ऑफ बडोदासोबत देशातील नॅशनल बँकेत भरती जाहीर केली आहे. आयबीपीएसद्वारे ही भरती केली जाणार आहे. यामध्ये लिपिक, प्रोबेशनरी ऑफिसर आणि स्पेशलिस्ट ऑफिसर या पदांसाठी भरती केली जाणार आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांना प्रिलियम आणि मुख्य परीक्षा द्यावी लागणार आहे. या परीक्षेनंतर मुलाखत घेतली जाणार आहे. त्यानंतरच उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
Discussion about this post