नवी दिल्ली । अनेक जण डिजिटल बँकिंग किंवा इंटरनेट बँकिंगकडे वळले आहेत. तसं असलं तरी अजूनही काही कामं अशी असतात जी बँकेत गेल्याशिवाय काही केल्या पूर्णच होत नाहीत. या आठवड्यात बँकांना सलग सुट्ट्या आल्या आहेत. 7 पैकी 6 दिवस बँकांचे कामकाज बंद राहणार आहे. ख्रिसमस आणि चौथ्या शनिवारमुळे बँकांचे व्यवहार विस्कळीत होण्याची शक्यता आहे. तुम्ही चेक डिपॉझिट किंवा इतर महत्त्वाच्या कामासाठी बँकेत जाणार असाल, तर आधी कोणत्या दिवशी आणि कोणत्या शहरात बँका बंद राहतील? पाहा संपूर्ण टाईमटेबल…
डिसेंबर महिना आणि वर्ष 2025 आता आपल्या शेवटच्या टप्प्यावर आला आहे. ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या स्वागताच्या तयारीत असतानाच, बँक ग्राहकांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. 22 डिसेंबरपासून सुरू झालेल्या या नवीन आठवड्यात देशातील विविध राज्यांमध्ये बँकांना 7 पैकी तब्बल 6 दिवस सुट्ट्या असणार आहेत. काही राज्यांत तर सलग ५ दिवस बँकांचे कामकाज बंद राहणार आहे.
डिसेंबरमध्ये सुट्ट्यांचा पाऊस
डिसेंबर 2025 मध्ये एकूण 19 दिवस बँका बंद राहणार आहेत. यात 4 रविवार आणि 2 शनिवारच्या सुट्ट्यांसह विविध राज्यांमधील स्थानिक सणांच्या 13 सुट्ट्यांचा समावेश आहे. 22 डिसेंबरपासून सुरू झालेल्या आठवड्यात ख्रिसमस, महिन्याचा चौथा शनिवार आणि रविवार अशा सलग सुट्ट्या आल्याने ग्राहकांनी आपली बँकेची कामे वेळेत नियोजन करून पूर्ण करणे गरजेचे आहे.
या आठवड्यातील सुट्ट्यांचे वेळापत्रक (22 ते 28 डिसेंबर):
22 डिसेंबर (सोमवार): लोसूंग/नामसूंग निमित्त सिक्कीममध्ये बँका बंद राहतील.
24 डिसेंबर (बुधवार): ख्रिसमसच्या पूर्वसंध्येनिमित्त मिझोरम, नागालँड आणि मेघालयमध्ये बँकांना सुट्टी असेल.
25 डिसेंबर (गुरुवार): ख्रिसमस (नाताळ) निमित्त संपूर्ण देशभरातील सर्व बँका बंद राहतील.
26 डिसेंबर (शुक्रवार): ख्रिसमस सेलिब्रेशनसाठी मिझोरम, नागालँड आणि मेघालयमध्ये बँकांचे कामकाज बंद राहील.
27 डिसेंबर (शनिवार): महिन्याचा चौथा शनिवार असल्याने देशभरातील सर्व बँका बंद राहतील. (नागालँडमध्ये ख्रिसमसची सुट्टीही याच दिवशी आहे).
28 डिसेंबर (रविवार): साप्ताहिक सुट्टीमुळे देशभरातील सर्व बँका बंद राहतील.















Discussion about this post