बांगलादेशामध्ये काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरू असल्याने त्याचा परिणाम आता कांदा निर्यातीवर झाल्याचे दिसून आले. बांगलादेशाच्या बॉर्डरवर कांद्याने भरलेले शंभरहून अधिक ट्रक निर्यातीसाठी उभे आहेत. हा कांदा खराब होण्याची भीती आहे.
दरम्यान, स्थानिक बाजारपेठेत कांद्याची आवक कमी असल्याने कांद्याचे बाजार भाव स्थिर आहेत. बांगलादेशात कांदा निर्यात न झाल्यास देशातंर्गत कांद्याचे भाव गडगडण्याची भीती व्यक्त होत आहे. जास्त दिवस हे सचार सुरू राहिल्यास कांदा निर्यात न झाल्यास त्यात ढगाळ व पावसाळी वातावरणामुळे हा कांदा खराब होईल. या पाठीमागे कांदा निर्यातदार व्यापाऱ्यांना 60 ते 70 कोटी रुपयांचा फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
भारत-बांगलादेश सीमेवर नाशिक मधून गेलेले कांद्याचे अनेक ट्रक अडकल्याची माहिती समोर येत आहे. 70 ते 80 ट्रक बांगलादेश च्या सीमेवर अडकले आहेत. केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी बांगलादेशमध्ये 80 हजार टन कांद्याची निर्यातसाठी परवानगी दिली होती. नाशिकमधून बांगलादेशमध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याची निर्यात होते. सीमा सुरु होण्यासाठी अजून पाच ते सहा दिवस लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
बांगलादेशमध्ये उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नाशिकहून निघालेले कांद्याचे जवळपास 70 ते 80 ट्रक बांगलादेशच्या सीमेलगत अडकून पडल्याची माहिती समोर येते आहे. शासन स्तरावर हे ट्रक सोडण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत.















Discussion about this post