धुळे शहरातील चाळीसगाव रोड परिसरातील जामचा मळा येथे गुप्तपणे सुरू असलेल्या बनावट दारूच्या कारखान्यावर धुळे पोलिसांनी छापा टाकला आहे. या कारवाईत पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले आहे आणि सुमारे आठ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली असून, यामागे धुळ्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांचे निर्देश होते.
धुळे शहरात सुमैय्या हॉलच्या पाठीमागे जामचा मळा येथे बनावट दारूचा कारखाना सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने छापा टाकला आणि शेख जावेद शेख मोहम्मद ऊर्फ जावेद नक्टया याच्या राहत्या घरातून अवैध देशी दारू तयार करण्याची कार्यशाळा उध्वस्त केली. ही दारू गुजरात राज्यात आणि इतर ठिकाणी निर्यात केली जात होती.
पोलिसांच्या कारवाईत सहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे, परंतु या गुन्हातील मुख्य सूत्रधार अद्याप फरार आहे. त्याचा शोध स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकातर्फे सुरू आहे. दारू विक्री करण्यास बंदी असतानाही अनेक ठिकाणी दारूची निर्मिती केली जात असते, याचा फायदा घेऊन बनावट दारू निर्मित करून त्याची विक्री केली जात होती.















Discussion about this post