पिकलेले केळे तर सगळेच खातात, पण कच्चे केळे खाणारे आणि त्याचे फायदे जाणणारे लोक खूप कमी आहेत. पिकण्याआधीच केळे खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. नेमके काय फायदे होतात कच्चे केळे खाण्याने ते आपण जाणून घेणार आहोत.
कच्चे केळीचे फायदे
-कच्चे केळीत फारच कमी कॅलरी असतात, म्हणून हे तुमचे वजन कमी करण्यास देखील उपयुक्त ठरू शकते. या केळींचे सेवन केल्याने पोट बर्याच वेळेसाठी भरलेले राहते, ज्यामुळे आपण जास्त अन्न खाणे टाळतो आणि यामुळे वजन वाढण्यास प्रतिबंध होतो.
-कच्च्या केळ्याच्या नियमित सेवनाने पचनक्रिया सुधारते. शरीरातील मलनि:सारण प्रक्रिया नीट होते. याशिवाय कच्च्या केळीमुळे हाडं मजबूत बनण्यासही मदत होते.
-मधुमेहाचा त्रास असणाऱ्या रुग्णांनाही कच्ची केळी फायदेशीर ठरू शकते. मधुमेह प्राथमिक स्तरावर असेल, तर कच्ची केळी खाणं सुरु करा. मधुमेहावर नियंत्रण मिळवण्यास मदत होऊ शकते.
-कच्च्या केळात फायबर आणि आरोग्यदायी स्टार्च असतं. त्यामुळे आतड्यांमध्ये काहीही न अडकू देता, ते स्वच्छ ठेवण्यास मदत होते. त्यामुळे जर तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर रोज कच्चं केळ खाणं फायदेशीर ठरू शकतं.
Discussion about this post