बुलढाणा । बुलढाणा जिल्ह्यात प्लास्टिक आणि कागदी चहाच्या कपवर बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. त्यामुळे यापुढे बुलडाणामधील नागरिकांना काचेच्या कपमध्येच चहा प्यायला मिळणार आहे.
कागदी प्लास्टिक कप यासह प्लास्टिक वस्तूवर बंदीचा कायदा तर शासन प्रशासनाचे आदेश आहेच तरीही महाराष्ट्रात राजेरोसपणे चहाचे कागदी कप आणि प्लास्टिक द्रोण, पत्रवळ्या, प्लेट्सची विक्री आणि निर्मिती सुरू होती. बीपीए नामक केमिकल वापरणाऱ्या प्लास्टिकमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात कॅन्सर होत आहे. असंख्य नागरिकांचे जीव जात आहे.
आता याबाबत शासन प्रशासन अलर्ट मोडवर आल्यामुळे मागील काही दिवसांत प्रशासकीय यंत्रणांनी सर्व विभाग प्रमुखांना कारवाई करण्याचे पत्र पाठवले.
कागदी प्लास्टिक कप यासह प्लास्टिक वस्तूवर बंदीला सुरूवात महाराष्ट्रातील प्रथम सुरूवात बुलडाणा जिल्ह्यापासून झाली. जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद, नगर विकास, आरोग्य विभाग, ग्रामपंचायत आदी विभागांनी त्यांच्या अंतर्गत काम करणाऱ्या सर्व तालुक्यातील प्रमुखांना कागदी कप आणि प्लास्टिक बंदीच्या अनुषंगाने कारवाई करण्याचे सूचनापत्र निर्गमित केले.
त्यानुसार बुलडाणा जिल्ह्यासह महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात चहाच्या कागदी कपांसह प्लास्टिक वर बंदीची कारवाई सुरू झाली. या आदेशानंतर आता चहा विक्रेते आणि ग्राहकांनी सुद्धा कागदी कप बाजूला सारले. ग्राहक आणि चहा विक्रेते यांनी शासन प्रशासनाच्या निर्णयाचे आणि ॲड.सतीशचंद्र रोठे पाटील यांच्या आंदोलनाचे स्वागत केले.
Discussion about this post