चाळीसगाव । चाळीसगाव -छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील कन्नड घाटामधून अवजड वाहनांवर बंदी घालण्यात आली आहे.उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ११ ऑगस्टपासून या बंदीची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात येवून कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.दरम्यान, बंदी असलेल्या वाहनांसाठी तीन पर्याय सुचवले आहेत.
कन्नड घाटात वाहतूक कोंडीची समस्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात ज्ञानेश्वर बागूल व इतरांनी जनहित याचिका दाखल केली होती. त्यानुसार सुनावणी होऊन याचिकेवर उच्च न्यायालयाने छत्रपती संभाजीनगर ते चाळीसगावदरम्यानच्या कन्नड घाटातून वन्यजीव प्राणीरक्षण व सतत होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे अवजड वाहतूक बंद केली आहे. याबाबत प्रभावी अंमलबजावणीचे आदेश जारी केले आहेत. त्यानुसार या निर्णयाची कालपासून अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे.
कन्नड घाटातील अवजड वाहतूक बंद केल्यानंतर पाहणी करून त्यासाठी पर्यायदेखील सुचविण्यात आले आहेत. बंदी असलेल्या वाहनांसाठी तीन पर्याय सुचवले आहेत. ते खालील प्रमाणे आहेत
पूर्वीचा मार्ग: औरंगाबाद ते कन्नड मार्गे चाळीसगाव-धुळे जाणारी जड वाहतुक
पर्यायी मार्ग: औरंगाबाद ते दौलताबाद टि पॉईट – कसाबखेडा – शिऊर बंगला- तलवाड़ा- नांदगाव मार्गे चाळीसगाव
पूर्वीचा मार्ग: चाळीसगाव – कन्नड औरंगाबाद कडे – येणारी जड वाहतुक
पर्यायी मार्ग: चाळीसगाव – नांदगाव तलवाड़ा- शिऊर बंगला – कसावखेडा – दौलताबाद टि पॉईट औरंगाबाद
पूर्वीचा मार्ग: जळगाव सिल्लोड फुलंबी- खुलताबाद मार्गे कन्नड कडे जाणारी वाहतुक
पर्यायी मार्ग: जळगाव-सिल्लोड फुलंब्री औरंगाबाद मार्गे दौलताबाद टि पॉईट- कसावखेडा-शिऊर बंगला-नांदगाव मार्गे चाळीसगाव जातील.