डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर अंतर्गत भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. इच्छुक उमेदवारांनी अजिबात वेळ वाया न घालवता अर्ज करावा. या भरतीद्वारे एकूण ७३ जागा भरण्यात येणार असून बुधवार २ एप्रिलपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली. २ मे दरम्यान केंद्र शासनाच्या ’समर्थ पोर्टल’ वरुन ‘ऑनलाईन’ पध्दतीने अर्ज करता येणार आहेत..
या भरतीद्वारे प्राध्यापक पदाच्या ०८ जागा, सहयोगी प्राध्यापकच्या १२ जागा, आणि सहाय्यक प्राध्यापकच्या ५३ जागा भरल्या जाणार आहे. केंद्रशासनाने विद्यापीठ व वरिष्ठ महाविद्यालयांसाठी ‘समर्थ पोर्टल’ तयार केले असून या माध्यमातून ही संपूर्ण भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
यासाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर लिंक देण्यात आली तर ऑनलाईन अर्जाची प्रत व सर्व कागदपत्रासह हार्ड कॉपी आस्थापना विभागात ९ मे रोजी कार्यालयीन वेळेत दाखल करावी लागणार आहे.
पात्रता काय?
प्राध्यापक – १) संबंधित विषयात पीएच.डी. पदवी २) विद्यापीठ/महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक/सहयोगी प्राध्यापक/प्राध्यापक म्हणून किमान दहा वर्षांचा अध्यापन अनुभव आणि/किंवा विद्यापीठ/राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्थांमध्ये समकक्ष स्तरावर संशोधन अनुभव, तसेच डॉक्टरेट पदवी यशस्वीरित्या मार्गदर्शन केल्याचा पुरावा.
सहयोगी प्राध्यापक – १) संबंधित विषयांमध्ये पीएच.डी. पदवीसह चांगला शैक्षणिक रेकॉर्ड, २) किमान ५५% गुणांसह पदव्युत्तर पदवी
सहाय्यक प्राध्यापक- भारतीय विद्यापीठातून संबंधित संलग्न विषयात ५५% गुणांसह पदव्युत्तर पदवी किंवा यूजीसी परिपत्रकानुसार मान्यताप्राप्त परदेशी विद्यापीठातून समकक्ष पदवी.
सविस्तर पात्रतेसाठी जाहिरात पाहावी
किती पगार मिळेल?
प्राध्यापक – 1,44,200/-
सहयोगी प्राध्यापक – 1,31,400/
सहाय्यक प्राध्यापक- 57,700/-
अर्ज शुल्क :
Rs. 500/- (for Open category)
Rs. 300/- (for Reservation Category)
ऑनलाइन अर्जाची हार्ड कॉपी सादर करण्याचा पत्ता: डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, सोनेरी महालाजवळ, जयसिंगपुरा, छत्रपती संभाजीनगर-431004.
Notification : PDF
Discussion about this post