जळगाव । जळगाव जिल्ह्यात रस्ते अपघाताच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढलेल्या दिसून येत आहे. जिल्ह्यात रोज कुठेना कुठे अपघात होत असून यात काहींना जीवावर मुकावे लागत आहे. याच दरम्यान आता अज्ञात चारचाकी मालवाहू वाहनाने जोरदार धडक दिल्याने बांभोरीतील दुचाकीस्वार जागीच ठार झाला तर सोबत असलेला त्यांचा भाऊ गंभीर जखमी झाला. याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
निलेश झगडू सोनवणे (वय ४५ रा.टोळी बांभोरी, ता.धरणगाव) असे मयताचे नाव आहे.मयताच्या पश्चात आई शांताबाई, वडील झगडू सोनवणे, भाऊ अजय, पत्नी शीतल आणि मुलगी असा परिवार आहे. निलेश झगडू सोनवणे हे आई-वडील, भाऊ, पत्नी आणि मुलगी यांच्या सोबत वास्तव्याला होते. धरणगाव येथील आर.ओ.पाणी वाटप करण्याचे काम करत होते. नेहमीप्रमाणे आरओचे पाणी वाटप झाल्यानंतर निलेश सोनवणे हा त्यांचा भाऊ अजय सोनवणे यांच्यासोबत दुचाकीने बांभोरी येथे घरी येण्यासाठी बुधवार, 28 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता धरणगाव येथून निघाले.
धरणगाव येथील रेल्वे उड्डाण पुलावरून जात असताना मागून भरधाव वेगाने येणार्या चारचाकी मालवाहू गाडीने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दोघे भाऊ गंभीर जखमी झाले. दोघांना तातडीने जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता यातील निलेश सोनवणे याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे .















Discussion about this post