मुंबई । मनी लाँड्रिंग प्रकरणात अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना तब्बल एका वर्षानंतर काहीसा दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज दोन महिन्यांसाठी मंजूर केला आहे.वैद्यकीय कारणास्तव जामीन देण्यास ईडीने हरकत घेतली नाही.
नवाब मलिक यांना 23 फेब्रुवारी 2022 रोजी ईडीने अटक केली होती. कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम यांच्याशी संबंधित प्रकरणात मलिक यांना अटक झाली होती. दाऊद इब्राहिम यांच्याशी आर्थिक व्यवहार करणे तसेच त्याच्या बहिणीशी जमीन व्यवहार करण्यासंदर्भातील हे प्रकरण होते.
या कारणावरुन नवाब मलिक यांना ईडीने अटक केली होती. त्यानंतर नवाब मलिक आधी ईडी कोठडी आणि नंतर न्यायालयीन कोठडीत होते. तब्बल एका वर्षानंतर त्यांना दोन महिन्यांसाठी जामीन मिळाला आहे. प्रकृतीच्या कारणावरुन त्यांना जामीन मिळाला आहे.
Discussion about this post