मुंबई । बदलापूरमध्ये चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचारामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. आरोपी अक्षय शिंदेला फाशी देण्याची मागणी लोकांकडून करण्यात आली होती. दरम्यान, अशातच या प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याने आत्महत्या केलीय.
आज बदलापूर पोलिसांचे पथक त्याचा ताबा घेऊन पोलीस ठाण्याकडे जात होते. तळोजा कारागृहातून साडेपाच वाजता त्याला ठाण्याला घेऊन जात होते. त्यावेळी पोलिसांची बंदूक हिसकावून घेत त्याने स्वत:वर देखील गोळी झाडली. अक्षय शिंदे याने तीन राऊंड फायर केलेत.अक्षयने तीन गोळ्या झाडल्याने ही आत्महत्या नसून पोलिसांनी त्याचा एन्काऊंटर करण्यात आल्याच म्हटलं जात आहे. बदलापूर मधील एका शाळेत त्याने अल्पवयीन मुलीवर त्याने अत्याचार केला होता. परंतु या प्रकरणात त्याला अडकवलं जात असल्याचा आरोप त्याच्या आईने केला होता.
बदलापूर पूर्वेतील खरवई गावात राहणारा आरोपी अक्षय शिंदे याचे वय केवळ 24 वर्षे आहे. त्याचे तीन वेळा लग्न झाले होते. मात्र त्याच्या तीनही पत्नी त्याला सोडून गेल्या होत्या. तो मानसिक रुग्ण असल्याची माहिती देखील समोर आली होती. अक्षयवर दोन मुलींवर लैंगिक छळ केल्याचा आरोप होता.
Discussion about this post