मुंबई । लोकसभेच्या निवडणुकीनंतर आता महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक होणार असून या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे अनेक मोठ्या घडामोडी घडत आहेत. या निवडणुकीसाठी सर्वच पक्षाकडून रणनीती आखायला सुरुवात झाली आहे. अशात स्वराज्य संघटना आणि प्रहार संघटनामध्ये सर्वात मोठी घडामोड होणार आहे.
मिळलेल्या माहितीनुसार, छत्रपती शिवाजी महाराज यांचे कोल्हापूर गादीचे वंशज तथा राजर्षी शाहू महाराजांचे वंशज संभाजीराजे छत्रपती यांची प्रहार संघटना आहे. प्रहार संघटनेचं आता पक्षात रुपांतर होणार आहे. स्वराज्य संघटना प्रत्यक्षात राजकारणात सक्रिय होणार आहे. आमदार बच्चू कडू हे संभाजीराजे छत्रपती यांच्यासोबत राजकीय मैत्री करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेपुढे मोठा पर्याय उभा राहणार आहे.
वृत्तानुसार, स्वराज्य पक्ष, प्रहार संघटना एकत्र विधानसभा निवडणुका लढणार असल्याची चर्चा आहे. संभाजीराजे छत्रपती आणि बच्चू कडू एकत्र विधानसभा निवडणूक लढण्याची घोषणा करण्याची शक्यता आहे. आज 9 ऑगस्टला अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत कोणता पक्ष कोणासोबत युती करणार याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. राज्यात सध्या दोन आघाड्या महत्वाच्या आहे. त्यात महायुतीचे घटक पक्ष, दुसरीकडे महाविकास आघाडी असून आता राज्यातील छोट्या पक्षांनी एकत्र येत तिसरी आघाडी स्थापन करण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत.















Discussion about this post