गोंदिया ! राज्यातील गोंदिया जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी गोंदियाचं पालकमंत्री पद सोडलं आहे. आता इंद्रनील नाईक गोंदियाचे नवीन पालकमंत्री असणार आहेत. मात्र बाबासाहेब पाटलांनी अचानक पालकमंत्री पद सोडल्यामुळे राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बाबासाहेब पाटील यांनी गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री पद सोडलं आहे. त्यांनी प्रकृतीच्या कारणास्तव पालकमंत्री पदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. बाबासाहेब पाटील यांच्या गुडघ्याचं ऑपरेशन झाले आहे. त्यामुळे त्यांना सातत्याने पायाचा प्रॅाब्लेम येत असल्यामुळे लांबचा प्रवास शक्य नाही, त्यामुळे पालकमंत्री पद सोडल्याचे सांगण्यात आले आहे.
बाबासाहेब पाटील यांनी पालकमंत्री पद सोडल्यानंतर गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री पदाची जबाबदारी इंद्रनील नाईक यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. ते विदर्भातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मोठे नेते म्हणून ओळखले जातात. तसेच तरुणाईमध्ये त्यांची मोठी प्रसिद्ध असून, ते स्वतः युवा आहेत. पालकमंत्री पदावर इंद्रनील नाईक यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती स्वतः अजित पवारांच्या वतीने देण्यात आली आहे.















Discussion about this post