जळगाव । राज्य सरकारने प्रशासनात महत्त्वाचे बदल केले आहे. सरकारने पाच आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची बदली करण्यात आली असून याबाबतचे आदेश आज निर्गमीत करण्यात आले आहेत.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी रोहन घुगे हे जळगावचे जिल्हाधिकारी म्हणून रूजू होणार आहेत. रोहन घुगे हे सध्या ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. आता ते जळगावचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यभार सांभाळणार आहेत.















Discussion about this post