जळगाव। कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे दिले जाणारे सन २०२३ चे उत्कृष्ट महाविद्यालये / परिसंस्था / प्राचार्य / शिक्षक आणि उत्कृष्ट अधिकारी कर्मचारी पुरस्कार जाहीर झाले आहे. त्यानुसार व्यावसायिक महाविद्यालये / परिसंस्था गटात शिरपूर येथील आर.सी. पटेल इन्स्टिटयूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च आणि जळगाव येथील जी.एच रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजि. अॅण्ड बिझनेस मॅनेजमेंट संस्थेला संयुक्तपणे जाहीर झाला आहे. तर फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालय हे अव्यावसायिक महाविद्यालय गटात उत्कृष्ट महाविद्यालय ठरले आहे.
हे पुरस्कार मंगळवार दि. ८ ऑक्टोबर रोजी विद्यापीठाने जाहीर केले. दरम्यान गेल्या दोन वर्षापासून दिल्या जाणाऱ्या राज्य पातळीवरील कवयित्री बहिणाबाई चौधरी पुरस्कारासाठी आलेल्या प्रस्तावांपैकी एकही व्यक्ती अथवा संस्थेची शिफारस निवड समितीने केलेली नाही. त्यामुळे हा पुरस्कार यावर्षी जाहीर झाला नाही.
उत्कृष्ट महाविद्यालय, प्राचार्य, शिक्षक, कर्मचारी व संशोधक पुरस्कार विजेते पुढील प्रमाणे
उत्कृष्ट महाविद्यालय / परिसंस्था – १) शिरपूर एज्युकेशन सोसायटी संचलित, आर.सी. पटेल इन्स्टिटयूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च, शिरपूर, जि. धुळे आणि जी.एच रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजि. अॅण्ड बिझनेस मॅनेजमेंट, जळगाव संयुक्त पणे (व्यावसायिक), २) तापी परिसर विद्या मंडळ संचलित, धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर (अव्यावसायिक), आदर्श विद्यापीठ प्रशाळा – १) रासायनिक शास्त्र प्रशाळा, कबचौउमवि, उत्कृष्ट प्राचार्य – प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर सुर्यवंशी (महात्मा गांधी शिक्षण प्रसारक मंडळाचे दादासाहेब सुरेश पाटील महाविद्यालय, चोपडा), उत्कृष्ट शिक्षक (महाविद्यालय) – १) डॉ. अनिल बारी (बोदवड महाविद्यालय, बोदवड) २) डॉ. विेवेकानंद चटप (एच. आर. पटेल इन्स्टिटयूट ऑफx फार्मास्युटिकल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च, शिरपूर), उत्कृष्ट शिक्षक (विद्यापीठ) प्रा. डी.एच. मोरे (रसायन शास्त्र प्रशाळा, कबचौउमवि, जळगाव), उत्कृष्ट अधिकारी (विद्यापीठ वर्ग -१) – इंजि. राजेश पाटील (विद्यापीठ उपअभियंता, बांधकाम विभाग), उत्कृष्ट कर्मचारी (विद्यापीठ वर्ग -३) – १) रामानंद बऱ्हाटे (वरिष्ठ सहायक, संगणक केंद्र), २) संतोष गव्हाळे (लघुलेखक, सभा व दप्तर विभाग), उत्तेजनार्थ : १) चित्रांगा चौधरी (लघुलेखक,विधी व माहितीचा अधिकार विभाग), २) श्रीमती जयश्री देशमुख (वरिष्ठ सहायक, प्रशासन विभाग), उत्कृष्ट कर्मचारी (विद्यापीठ वर्ग -४) १) राजेश अवचारे (से.नि. शिपाई), २) बलभिम गिरी (कुशल परिचर, आरोग्य केंद्र), दैनिक वेतनिक विद्यापीठ (उत्तेजनार्थ) : १) समाधान पाटील (जनसंपर्क विभाग), २) भरत चौधरी (कुलसचिव कार्यालय), उत्कृष्ट अधिकारी (महाविद्यालय वर्ग -२) – संजय बागुल (रजिस्ट्रार, (एच. आर. पटेल इन्स्टिटयूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च, शिरपूर), उत्कृष्ट कर्मचारी (महाविद्यालय वर्ग -३) -१) राजेंद्र कदम (कनिष्ठ लुघुलेखक, किसान कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, पारोळा), २) सुनील पाटील (मुख्य लिपीक, पंकज कला महाविद्यालय, चोपडा), ३) गोपीचंद पाटील (अधिक्षक, सि.गो. पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, साक्री), ४) जितेंद्र शिरसाठ (लिपीक, एच.आर. पटेल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मा., शिरपूर), ५) कु. मीना शहा (वरीष्ठ लिपीक, डी.एच. अग्रवाल कला, श्रीरंग अवधुत वाणिज्य व सी.सी. शहा- एम.जी.अग्रवाल विज्ञान महाविद्यालय, नवापूर) उत्कृष्ट कर्मचारी (महाविद्यालय वर्ग -४) – १) नारायण बोबडे (प्रयोगशाळा परिचर, राणी लक्ष्मीबाई महाविद्यालय, पारोळा),२) रवींद्र अहिरे (प्रयोगशाळा परिचर, गिताबाई महाजन कला, केशरीमल नवलखा वाणिज्य व मनोहरशेठ धारीवाल विज्ञान महाविद्यालय, जामनेर), ३) अंकुश गायकवाड (शिपाई, विद्यावर्धिनी महाविद्यालय, धुळे), ४) दिनेश झिने (ग्रंथालय परिचर, संत जगनाडे महाविद्यालय, खापर, जि. नंदुरबार)
विद्यापीठ शिक्षकांसाठी प्रकाशन पुरस्कार १) प्रा. एस.एन पाटील (पर्यावरणशास्त्र प्रशाळा), २) प्रा.पी.पी. माहुलीकर (रसायनशास्त्र प्रशाळा) ३) डॉ. वंदना शिंदे (भौतिकशास्त्र प्रशाळा) ४) डॉ. विकास पाटील (रासायनिक तंत्रज्ञान संस्था), ५) डॉ.विकास गीते (रसायनशास्त्र प्रशाळा),६) प्रा. आर.एस. बेंद्रे, (रसायनशास्त्र प्रशाळा),७) डॉ. सतीश पाटील ( जैवशास्त्र प्रशाळा),
८) प्रा. जितेंद्र नाईक (रासायनिक तंत्रज्ञान संस्था), ९) डॉ. दीपक दलाल (रसायनशास्त्र प्रशाळा), पेटंट पुरस्कार – १) प्रा. जितेंद्र नाईक (रासायनिक तंत्रज्ञान संस्था) २) प्रा. आर.एस. बेंद्रे, (रसायनशास्त्र प्रशाळा), ३) डॉ. एस.आर. कोल्हे (संगणकशास्त्र प्रशाळा) महाविद्यालयीन शिक्षकांसाठी संशोधन पुरस्कार (प्रकाशन ) – १) डॉ. चंद्रगौडा पाटील (आर.सी.पटेल, इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटीकल, शिरपूर) २) डॉ. लक्ष्मीकांत झंवर (एच.आर. पटेल, इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटीकल, शिरपूर) ३) डॉ. अतुल शिरखेडकर (आर.सी.पटेल, इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटीकल, शिरपूर) ४) डॉ. उज्वलदीप देवरे (आर.सी.पटेल, इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटीकल, शिरपूर) ५) डॉ. लालचंद पटले (महात्मा गांधी शिक्षण प्रसारक मंडळाचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, चोपडा), ६) डॉ. सौरभ खडसे (आर.सी.पटेल, इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटीकल, शिरपूर) ७) डॉ. सौरभ गणोरकर (आर.सी.पटेल, इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटीकल, शिरपूर) ८) डॉ. हितेंद्र महाजन (आर.सी.पटेल, इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटीकल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च, शिरपूर), ९) डॉ. मोहन कळसकर (आर.सी.पटेल, इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटीकल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च, शिरपूर), १०) डॉ. शैलेश चालिकवार (आर.सी.पटेल, इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटीकल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च, शिरपूर), ११) डॉ. कैलास मोरावकर (आर.सी.पटेल, इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटीकल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च, शिरपूर), १२) डॉ. प्रवीण पाटील (एच.आर. पटेल, इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटीकल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च, शिरपूर), १३) डॉ. हारूण पटेल (आर.सी.पटेल, इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटीकल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च, शिरपूर), १४) डॉ. गौरव धडसे (जी.एच. रायसोनी इन्स्टि., जळगाव). पेटंट पुरस्कार – १) डॉ. मधुचंद्र भुसारे (महात्मा गांधी शिक्षण प्रसारक मंडळाचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, चोपडा), २) डॉ. संजयकुमार बारी (एच.आर. पटेल, इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटीकल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च, शिरपूर), ३) डॉ. अक्षय घोरपडे (गिताबाई महाजन कला, केशरीमल नवलखा वाणिज्य व मनोहरशेठ धारीवाल विज्ञान महाविद्यालय, जामनेर ), ४) डॉ. हारूण पटेल (आर.सी.पटेल, इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटीकल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च, शिरपूर), ५) डॉ. लालचंद पटले (महात्मा गांधी शिक्षण प्रसारक मंडळाचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, चोपडा), ६) डॉ. शैलेश चालिकवार (आर.सी.पटेल, इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटीकल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च, शिरपूर), ७) डॉ. कैलास मोरावकर (आर.सी.पटेल, इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटीकल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च, शिरपूर), ८) डॉ. मोहम्मद रागीब मोहम्मद उस्मान (शरदचंद्रीका पाटील कॉलेज ऑफ फार्मसी, चोपडा), ९) ) डॉ. सौरभ गणोरकर (आर.सी.पटेल, इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटीकल, शिरपूर)
उत्कृष्ट केंद्रीय मूल्यमापन प्रकल्प राबविणारे महाविद्यालये व समन्वयक (जळगाव जिल्हा) – १) पु.ओ. नाहटा वाणिज्य महाविद्यालय, भुसावळ, समन्वयक – प्रा. हर्षल पाटील (पु.ओ. नाहटा वाणिज्य महाविद्यालय, भुसावळ), २) लोकसेवक मधुकरराव चौधरी फार्मसी महाविद्यालय, फैजपूर, समन्वयक – प्रा. मयुर नारखेडे (लोकसेवक मधुकरराव चौधरी फार्मसी महाविद्यालय, फैजपूर), ३) किसान महाविद्यालय, पारोळा, समन्वयक – प्रा. नितीन पाटील (किसान महाविद्यालय, पारोळा), ४) धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर, समन्वयक – डॉ. आर.डी. नारखेडे (धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर), ५) यशोदाबाई सराफ कॉलेज ऑफ फार्मसी साकेगाव, समन्वयक – कुंदन महाजन (यशोदाबाई सराफ कॉलेज ऑफ फार्मसी साकेगाव) (धुळे जिल्हा) – १) आर.सी.पटेल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, शिरपूर, समन्वयक -प्रा. निलेश बाविस्कर (आर.सी.पटेल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, शिरपूर) २) एस.पी.डी.एम. महाविद्यालय, शिरपूर, समन्वयक – प्रा. संदीप सोलंकी (एस.पी.डी.एम. महाविद्यालय, शिरपूर), २) झेङ बी. पाटील महाविद्यालय, धुळे, समन्वयक – प्रा. जे.सी. पाटील (झेङ बी. पाटील महाविद्यालय, धुळे) (नंदुरबार जिल्हा) – १) पीएसजीव्हीपीएसचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, शहादा, समन्वयक – प्रा.वर्षा पाटील (पीएसजीव्हीपीएसचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, शहादा), २) जी.टी.पी. महाविद्यालय, नंदुरबार, समन्वयक – प्रा. केशव परदेशी (जी.टी.पी. महाविद्यालय, नंदुरबार) ३) जिजामाता महाविद्यालय, नंदुरबार, समन्वयक – प्रा. अनिस कुरेशी (जिजामाता महाविद्यालय, नंदुरबार)
विद्यापीठातर्फे राज्यपातळीवरील कवयित्री बहिणाबाई चौधरी पुरस्कार यावर्षी शिक्षणक्षेत्रासाठी जाहीर करण्यात आला होता. त्यासाठी राज्यातील शिक्षण क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्था अथवा व्यक्तींकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते. या पुरस्कारासाठी केवळ आठ प्रस्ताव प्राप्त झाले त्यामध्ये तीन संस्था पातळीवरील व पाच व्यक्तींचे प्रस्ताव होते. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. आर.एस. माळी यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्कार निवड समिती गठीत करण्यात आली होती. त्यामध्ये सी.ओ.ई.पी. तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुनील भिरूड व मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. अजय भामरे यांचा सदस्य म्हणून समावेश होता. पुरस्कारासाठी प्राप्त झालेल्या प्रस्तावांचे समितीने अवलोकन केले व या पुरस्कारासाठी कोणत्याही प्रस्तावाची शिफारस केली नाही. त्यामुळे यावर्षीचा हा पुरस्कार दिला जाणार नाही.















Discussion about this post