मुंबई । एकीकडे राज्यात उन्हाचा तडाखा पाहायला मिळत असून यातच हवामान खात्याने अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविला आहे. महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उर्वरित महाराष्ट्रात तापमानाचा पारा वाढण्याची शक्यता आहे.
या जिल्ह्यांना पावसाचा अंदाज?
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे वातावरणात मोठा बदल झाला आहे. पुढील तीन दिवस राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. वर्धा , गोंदिया, भंडारा या जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे.वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा आणि गारपीटीचा इशारा देण्यात आला आहे. पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होऊ शकते.
तर मुंबई, पुण्यासह सोलापूर, नाशिक आणि कोकणात उन्हाची झळ लागण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांत राज्यात कडाक्याचे उन पडत आहे. अनेक जिल्ह्यातील तापनाम ४० अंशाच्या पुढे गेले आहे. उन्हामुळे आरोग्यावर परिणाम होत आहे, त्यातच आता काही जिल्ह्यात अवकाळीचा इशारा देण्यात आला आहे. कोणत्या जिल्ह्यात किती तापमान होतं?
विदर्भातील ५ जिल्ह्यात पारा ४० अंशावर
राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद विदर्भातील ब्रह्मपुरीमध्ये
ब्रह्मपुरी येथे सोमवारी ४१.५ अंश डिग्री तापमानाची नोंद
ब्रह्मपुरीसह अकोला, चंद्रपूर, वाशीम आणि वर्धा या जिल्ह्यात तापमानात वाढ
अकोला ४०.१, चंद्रपूर ४१.२, वाशीम ४०.२ आणि वर्धा मध्ये ४० अंश तापमानाची नोंद
पुण्यात ३८.७ अंश डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद
सांगली, सातारा मध्ये सुद्धा चाळीशी जवळ
Discussion about this post