जळगाव : राज्यात अपघाताचे सत्र सुरूच असून दिवसेंदिवस या घटना वाढतच चालल्या आहे. अशातच छत्रपती संभाजीनगर-जळगाव मार्गावर मोठा अपघात झाला आहे. माणिकनगर येथील पूर्णा नदीच्या पुलावरून कार नदीत पडल्याने तिघे जण जखमी झाले आहेत. त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.
सिल्लोडहून छत्रपती संभाजीनगरकडे जाणारी एक कार माणिकनगर येथील पूर्णा नदीवरील पुलाच्या तुटलेल्या कठड्यातून नदीच्या पात्रात कोसळली. त्या ठिकाणी नदीचे पात्र आणि पुलाची उंची जवळपास ३० ते ३५ फूट इतकी आहे.
शिवाजी नामदेव पांडे (४५), संदीप जनार्दन पिसाळ (३०) आणि मयूर सुनिल राऊत (२३) अशी जखमींची नावे आहेत. सर्व सिल्लोड तालुक्यातील राहणारे आहेत . या जखमींना नागरिकांनी तातडीने रुग्णवाहिकेच्या मदतीने सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.
Discussion about this post