मुंबई । गौरी-गणपती उत्सव लक्षात घेत शासकीय कर्मचारी, निवृत्ती वेतनधारकांना ऑगस्ट महिन्याचा पगार पाच दिवस आधीच म्हणजे २६ ऑगस्ट रोजीच मिळणार आहे. राज्य सरकारनं शासन निर्णय काढून 1 सप्टेंबर रोजी होणारे कर्मचारी व अधिकार्यांचे वेतन 26 ऑगस्ट रोजी देण्यास सरकारकडून मान्यता देण्यात आली आहे.
जिल्ह परिषद, मान्यता प्राप्त व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था, अकृषि विद्यापीठे/ कृषी विद्यापीठे व त्यांच्या संलग्न अशासकीय महाविदयालयांचे अधिकारी व कर्मचारी तसेच निवृत वेतनधारकांन / कुटुंब निवृत वेतन धारक यांनाही हा निर्णय लागू राहणार आहे.
२७ ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या वित्त विभागाने हा शासन निर्णय जारी केला. अंमलबजावणीसाठी, मुंबई वित्तीय नियम, १९५९ आणि महाराष्ट्र कोषागार नियम, १९६८ मधील काही तरतुदी तात्पुरत्या शिथिल केल्या आहेत.















Discussion about this post