नवी दिल्ली । जुलै महिना संपत आला असून पाच दिवसांनी ऑगस्ट महिना सुरू होणार आहे. प्रत्येक महिन्याप्रमाणे ऑगस्ट 2024 च्या सुरुवातीला अनेक मोठे आर्थिक बदल (नियम बदल) पाहायला मिळणार आहेत, तर रक्षाबंधन, जन्माष्टमी यांसारख्या मोठ्या सणांमुळे बँकांना बंपर सुट्ट्या मिळणार आहेत. अशा परिस्थितीत बँकेशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे काम असल्यास ते लवकरात लवकर निकाली काढणे फायद्याचे ठरेल.
या सर्व सुट्ट्या सर्व राज्यांमध्ये लागू होणार नाहीत. आरबीआयच्या अधिकृत संकेतस्थळावरील सुट्ट्यांच्या यादीनुसार बँकिंगच्या सुट्ट्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये साजरे केल्या जाणाऱ्या सणांच्या किंवा संबंधित राज्यांमध्ये खास प्रयोजनानुसार सुट्टी जाहीर करण्यात येते.
ऑगस्ट महिन्यात या दिवशी बँकांना ताळे
3 ऑगस्ट : केर पूजा (आगरतळा)
4 ऑगस्ट : रविवारची सुट्टी
8 ऑगस्ट : तेंडोंग लो रम फातनिमित्त सुट्टी (गंगटोक)
10 ऑगस्ट : दुसरा शनिवार
11 ऑगस्ट : रविवार
13 ऑगस्ट : इंफाळमध्ये बँक बंद
15 ऑगस्ट : स्वातंत्र्य दिन
18 ऑगस्ट : रविवार
19 ऑगस्ट : रक्षाबंधन
20 ऑगस्ट : श्री नारायण गुरु जयंती
25 ऑगस्ट : रविवार
26 ऑगस्ट : जन्माष्टमी
31 ऑगस्ट : चौथा शनिवार
ऑनलाईन बँकिंग सेवा सुरु
सुट्टीच्या दिवशी ग्राहकांना बॅंकेच्या शाखेत जाऊन त्यांचे पैसे जमा करता येणार नाहीत किंवा शाखेतून पैसे काढता येणार नाहीत. परंतु एटीएममध्ये अशा सेवा उपलब्ध राहतील. ऑनलाईन बँकिंग सेवा, एटीएम आणि मोबाइल बँकिंगच्या माध्यमातून व्यवहार करता येईल. क्रेडिट, डेबिट कार्ड आणि युपीआयचा वापर करुन ऑनलाईन पेमेंट करता येईल.
Discussion about this post