यावल । महिलांसह अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना काही केल्या कमी होत नसून अशातच यावल तालुक्यातून एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. एका गावातील ६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर वृद्धाने अत्याचार केल्याची घटना घडली.
ही मुलगी घराबाहेर खेळत होती. याचदरम्यान त्याच भागातील राहणाऱ्या एका ६० वर्षीय वृद्धाने या मुलीला आपल्या घरात बोलवले आणि अत्याचार केला. ही घटना १८ नोव्हेंबरला घडली. प्रारंभी बदनामीची भीती या कुटुंबाला होती. मात्र, गुरुवारी त्यांनी यावल पोलिस ठाणे गाठले व त्या वृद्धाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित वृद्धास पोलिसांनी अटक केली आहे.
पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुनील मोरे करीत आहेत. दरम्यान या घटनेमुळे संबंधित गावात संताप व्यक्त करण्यात येत आहे. आरोपीस कडक शिक्षा ठोठविण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.
Discussion about this post