अहमदनगर । महाराष्ट्रामध्ये भर दिवसा होणाऱ्या गोळीबाराच्या घटनांमध्ये वाढ होत असलेली पाहायला मिळत असून जळगावमधील चाळीसगावच्या नगरसेवकावर झालेल्या हल्ल्यानंतर आता अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरमध्ये भरदिवसा शिवसेनेचे नगरसेवक युवराज पठारे यांच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार समोर आला. आरोपी हा अल्पवयीन असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे पोलिसांनी आरोपीची चौकशी सुरू केली असून कट्टा ताब्यात घेतला आहे.
याबाबत असे की, पारनेर शहरातील मुख्य स्थानकाच्या परिसरातील हॉटेल दिग्विजयमध्ये युवराज पठारे आपल्या समर्थकांसोबत येत होते. युवराज यांच्या येण्याआधीच काही तरूण त्या ठिकाणी येऊन बसले होते. ज्यावेळी पठारे हॉटलेमध्ये आले तेव्हा तिथेच बसलेल्या तरूणांपैकी एकाने उठून गावठी कट्टा पठारे यांच्या छातीला लावला. पिस्तुलाचा खटका आरोपीने दाबला मात्र फक्त आवाज झाला गोळी चालली नाही. त्यानंतर पठारे यांच्या समर्थकाने कट्टा हिसकावून घेतला.
युवराज पठारे यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करणारा आरोपी रांजणगाव मस्जिद येथील अल्पवयीन तरुण असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपीसोबत असलेले दोघेजण तिथून पळून गेले. उपस्थितांनी आरोपीला चोप देऊन पोलिसांकडे दिलं आहे. पोलीस आता चौकशी करत असून या हल्ल्यामागचं कारण काय? कोणाच्या सांगण्यावरून त्याने हल्ला केला का? याची चौकशी केली जाणार आहे.
Discussion about this post