रावेर । रावेर लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या भाजपकडून पुन्हा एकदा रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलीय. त्यामुळे त्यांचा सामना महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्याशी होणार आहे. असे असताना महायुतीचा घटक पक्ष असलेला प्रहार आणि भाजप मधील वाद समोर आला आहे. रावेर मतदारसंघाच्या उमेदवार रक्षा खडसे या प्रचारात केवळ बच्चू कडू यांचा फोटो वापरतात, मात्र प्रहारच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना डावलत जात असल्याचा आरोप केला जात आहे.
तसेच एक पत्र प्रसिद्ध करत रक्षा खडसेंना मतदान न करता सर्वात शेवटचं नोटांच बटन दाबण्याचेही आवाहन प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी केल आहे. यामुळे मात्र आता रावेर मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराविरुद्ध प्रहार संघटना रस्त्यावर उतरल्या चित्र आहे. परिणामी याचा फटका उमेदवार रक्षा खडसे यांना बसतोय का? की हा वाद शमवण्यासाठी उच्च पातळीवर काही घडामोडी घडतात का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
रक्षा खडसेंच्या विजयासाठी एकनाथ खडसे मैदानात
जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी रावेर लोकसभा मतदारसंघाच्या भाजप उमेदवार रक्षा खडसे यांच्या विजयासाठी आपल्या विविध पक्षातील समर्थकांसह रावेर तालुक्यात विविध भागत प्रचाराचा धुराळा लावला आहे. त्यासाठी रावेरच्या अनेक भागात बैठका घेतल्या जात आहेत. सोबतच मतदानाची टक्केवारी वाढण्याच्या प्रयत्नासह रक्षा खडसे यांच्या पाठीमागे एकनाथ खडसे समर्थक जोडण्याचा प्रयत्नही त्यांच्याकडून सुरु आहे.















Discussion about this post