जळगाव । मोकाट कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात ११ बकऱ्यांना ठार झाल्याची धक्कादायक घटना जळगाव शहरातून समोर आली आहे. या घटनेत शेळी मालकांचे जवळपास दीड ते दोन लाखांचे नुकसान झाले आहे. शासनाकडून तातडीने आर्थीक मदत देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.
जळगाव शहरात गेल्या अनेक महिन्यांपासून मोकाट कुत्र्यांचा उच्छाद वाढला आहे. शिवाजी नगर परिसरात आणि उस्मानिया पार्क येथे लहान मुलांवर देखील या मोकाट कुत्र्यांनी हल्ला करून जखमी केल्याच्या घटना घडल्या आहेत. याच आता वाल्मिक नगर परिसरातील वडामया राहणारे प्रकाश चिंतामण कोळी यांच्या मालकीच्या ११ बकऱ्या ह्या शनिवारी ३० मार्च रोजी रात्री ११ वाजता घराच्या जवळ असलेल्या गोठ्यात बांधण्यात आलेल्या होत्या. दरम्यान मध्यरात्री मोकाट असलेल्या कुत्र्यांनी गोठ्यात हल्ला चढवून ११ बकऱ्या फस्त केल आहे.
ही बाबत दुसऱ्या दिवशी रविवारी ३१ मार्च रोजी पहाटे ६ वाजता हा प्रकार लक्षात आल्याने शेळी पालन करणारे प्रकाश कोळी यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांनी आक्रोश केला. यावेळी मोकाट कुत्र्यांमुळे शेळी मालकांचे अंदाजे दीड ते दोन लाखांचे नुकसान झाले आहे. दरम्यान महापालिकेच्या दुर्लक्षपणामुळे मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी परिसरातील नागरीकांकडून केली जात आहे. यावेळी तलाठी राहुल सोनवणे यांनी पाहणी करून घटनेचा पंचनामा केला आहे. शासनाकडून तातडीने आर्थीक मदत देण्यात यावी अशी मागणी कोळी कुटुंबियांनी केली आहे. याप्रकरणी पोलीसात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.
Discussion about this post