प्रत्येकजण आपल्याकडे रोख रक्कम ठेवत नाही. जेव्हा रोख रक्कमेची गरज असते. तेव्हा एटीएममधून काढतात. मात्र, आता एटीएममधून पैसे काढण्यासाठी तुम्हाला जास्त शुल्क भरावे लागणार आहे.
एटीएम ऑपरेटर्सने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे एटीएममधून पैसे काढण्यावर दिले जाणारे इंटरचेंज शुल्क वाढण्यासाठी संपर्क साधला आहे. मनी कंट्रोलने याबाबत माहिती दिली आहे.
एटीएम ऑपरेटर्स आणि सीएटीएमआयने एटीममधून पैसे काढण्यासाठी प्रत्येक ट्रान्झॅक्शनला २३ रुपये शुल्क आकारावे, असे सांगितले आहे. दोन वर्षांपूर्वी इंटरचेंज शुल्क वाढवण्यात आले होते. हे दर वाढवून २१ रुपये करण्यात यावी, असे CATMI चे म्हणणे आहे. तर एटीएम ऑपरेटर्सनी हे शुल्क २३ रुपये करण्याची मागणी केली आहे.
एटीएममधून पैसे काढताना काही ठरावीक रक्कमेपर्यंत तुम्हाला पैसे काढण्यासाठी कोणतेही शुल्क लागत नाही. परंतु मर्यादेपेक्षा जास्त पैसे काढले तर तुम्हाला शुल्क भरावे लागते. हेच शुल्क आता वाढणार असल्याचे सांगण्यात येत आहे.















Discussion about this post