नंदुरबार । शहरातील करण चौफुली भागातील एसबीआयचे एटीएम चोरट्यानी पळवून नेले, सदर एटीएम फोडलेल्या अवस्थेत कोळदा शिवारात पोलिसांना आढळून आले. यातून २६ लाख २३ हजाराची रोकड चोरट्यानी चोरून नेली आहे, हातात ग्लोज आणि तोडाला रुमाल बांधलेले ४ ते ५ संशयीत चारचाकी वाहनात एटीएम उचलून नेत असताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.
नंदुरबार शहरातील करण चौफुली परिसरात स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखा असून तेथे बँकेचे एटीएम आहे. चोरटयांनी काल गुरुवारी मध्यरात्रीनंतर येथील एटीएम उचलून नेले. एटीएममध्ये ३० लाखाचा भरणा करण्यात आला होता. दरम्यान काही रक्कम ग्राहकांनी काढली असून उर्वरित सुमारे २६ लाख २३ हजार ७०० रुपयांची रोकड चोरट्यांनी चोरून नेली आहे. एटीएम मशीनची वायर कापून चोरट्यानी मशीन चोरून नेले आहे. माहिती मिळताच पोलिसांनी करण चौफुलीसह कोळदा शिवारात धाव घेत पाहणी केली. सदर एटीएम मशीन शहरापासून तब्बल ६ ते ७ किमी अंतरावरील कोळदा शिवारातील भागसरी रस्त्यावर नेत तेथे कटरच्या सहाय्याने कापून नेल्याचे पोलिसांना आढळून आले.
चोरट्यांनी त्यातील सर्व रोकड काढून पेटी तशीच फेकून दिल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिल्ली. चोरट्यांनी एटीएम उचलून नेल्याची माहिती पोलिसांना समजल्याबरोबर भल्या सकाळीच धावाधाव सुरु झाली. पोलिस अधिक्षक अवण दत्त एस., अप्पर पोलिस अधिक्षक निलेश तांबे, उपविभागीय पोलिस अधिकारी संजय महाजन, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार खेडकर, उपनगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संजोग बच्छाव यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी श्वान पथक व ठसे तज्ञांना पाचारण केले होते
Discussion about this post