मुंबई । राज्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा ईमेल आयडी हॅक झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.ई- मेल हॅक झाल्यानंतर थेट राज्यपालांना मेल केल्याचेही समोर आले आहे. या प्रकरणी मुंबईतील मरीन लाईन्स पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या हॅकींग प्रकारमुळे विधानसभा अध्यक्षांच्या सायबर सुरक्षेसंदर्भात प्रश्न उपस्थित झाला आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा ईमेल आयडी हॅक करुन राज्यपाल राज्यपाल रमेश बैस यांना मेल करण्यात आला. त्या मेलमध्ये आमदार सभागृहात नीट वागत नाही. त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. ईमेल हॅक झाल्याची बाब विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सोमवारी दुपारी चार वाजता लक्षात आली.
त्यानंतर त्यांनी या प्रकरणी मुंबईतील मरीन लाईन्स पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. विधानसभा अध्यक्षांची सायबर सुरक्षा तोडणाऱ्यांचा शोध पोलीस घेत आहेत.















Discussion about this post