मुंबई । नाशिकमध्ये स्वतःला ‘आध्यात्मिक गुरू’ म्हणवणाऱ्या भोंदू बाबा अशोक खरातच्या घाणेरड्या कारनाम्यांचे एकामागून एक धक्कादायक खुलासे होत आहेत. आता या प्रकरणात नवे ट्विस्ट समोर आले असून, त्याने आपल्या विकृत कृत्यांसाठी खास ‘कोडवर्ड सिस्टम’ तयार केल्याचे उघड झाले आहे.
तपास यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार, खरात आपल्या केबिनमध्ये महिलांना “शुद्धीकरण”च्या नावाखाली बोलावायचा आणि त्याआधी बाहेर असलेला झुंबराचा दिवा बंद करायचा. हा दिवा बंद असणे म्हणजे आत कोणालाही प्रवेश नाही, असा संकेत कर्मचाऱ्यांना दिला जायचा. या सांकेतिक पद्धतीमुळे कार्यालयातील लोकांनाही सर्व काही माहित असूनही ते गप्प बसत होते.
धक्कादायक बाब म्हणजे, या भोंदू बाबाने आतापर्यंत १५० हून अधिक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. इतकेच नव्हे, तर ‘अवतार पूजा’ सारखे शब्द वापरून तो लाखो रुपयांची फसवणूकही करत होता. याचबरोबर, “तुर्कीमधील जादुई मध” म्हणून प्रति किलो तब्बल १५ लाख रुपये घेऊन लोकांना गंडा घालण्याचा प्रकारही समोर आला आहे.
आतापर्यंत या प्रकरणात १० गुन्हे दाखल झाले असून, एसआयटीकडून चौकशी सुरू आहे. तपास जसजसा पुढे जात आहे, तसतसे या ‘भोंदू साम्राज्या’चे आणखी भयानक पैलू समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणामुळे अंधश्रद्धेच्या नावाखाली सुरू असलेल्या फसवणुकीवर पुन्हा एकदा मोठा प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे.















Discussion about this post