मुंबई । राज्यातील काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हाण यांनी आज काँग्रेसची अनेक वर्षांची साथ सोडून भाजपामध्ये प्रवेश केला. यावेळी त्यांनी काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय, आपला वैयक्तिक निर्णय असून काँग्रेसच्या कोणत्याही नेत्यावर टीका किंवा आरोप करण्याचं त्यांनी टाळलं आहे.
काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय सोपा नव्हता. त्यासाठी खूप विचार केला. काही गोष्टी चांगल्या होत आहेत तर त्यात आपला पण वाटा हवा ही भावना आहे. काँग्रेस पक्षाने मला खूप काही दिलं तसच मी पण पक्षासाठी खुप काही योगदान दिलं आहे. अचानक माझ्यावर काही आरोप करत असेल तर ते बरोबर नसल्याचं ते म्हणाले.
आज मी माझ्या आयुष्याची नवी सुरुवात करत आहे. गेल्या ३८ वर्षांच्या राजकीय प्रवासात हा एक नवा बदल आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रेरणा घेऊन पुढे वाटचाल करता याची. देशाच्या प्रगतीत आपला वाटा असावा या प्रमाणिक भूमिकेतून भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचं ते म्हणाले.
Discussion about this post