मुंबई : आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारणात मोठ्या हालचाली वाढल्या आहे. यातच काँग्रेसला एकामागोमाग झटके बसताना दिसत आहे. आता काँग्रेसच्या गोटातून मोठी बातमी… राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या प्रथम सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना अशोक चव्हाण यांनी पत्र लिहिलं आहे. या पत्राच्या माध्यमातून त्यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा रादीनामा दिला आहे. मागच्या काही दिवसांपासून अशोक चव्हाण काँग्रेस पक्षात नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती.
शिवाय अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करतील, अशीही चर्चा होत होती. अशातच आता अशोक चव्हाण आजच भाजपत प्रवेश करण्याची शक्यता आहे. काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने त्यांच्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब झाल्याचं पाहायला मिळत आहे.
Discussion about this post