जळगाव | श्री समर्थ प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, आव्हाने शिवार आणि आव्हाने ग्रामपंचायत तसेच समस्त ग्रामस्थांच्या वतीने, आषाढी एकादशी निमित्ताने “आम्ही बाल वारकरी स्वामी समर्थ विद्यालयाचे” या दिंडी स्वरूपी कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष मनोजकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनातून आव्हाणे गावात करण्यात आले होते.
याप्रसंगी आव्हाने गावाच्या सरपंच सौ.भारतीताई भगवान पाटील, सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच भगवान नामदेव पाटील,अजय शिंदे. (पोलीस पाटील), ॲड.हर्षल प्रल्हाद चौधरी, (माजी पंचायत समिती सदस्य),सुनील गोपाल चौधरी, काशिनाथ भिका पाटील,मंगल नारायण पाटील, विलास चिंतामण चौधरी, राजेंद्र यादव सपकाळे (पालक प्रतिनिधी),रामकृष्ण नामदेव पाटील (पालक प्रतिनिधी),नामदेव यशवंत धनगर.( ज्येष्ठ नागरिक), गणपत धीरज चौधरी, लक्ष्मण गोपाल चौधरी, जानकीराम लक्ष्मण पाटील, रमेश पाटील,लक्ष्मण चिंधू चौधरी व माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.वैशाली शिंदे तसेच श्री समर्थ प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. हर्षाली पाटील यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाचे उपशिक्षक अजय सूर्यवंशी यांनी श्रीभक्त पुंडलिकाच्या कथेने केली. सहकारी उपशिक्षिका सौ. आशा पाटील यांनी कथेचा सार विद्यार्थ्यांना समजावून सांगितला .यानंतर मान्यवरांच्या हस्ते मारुती मंदिरात मारुती पूजन करण्यात आले आणि पालखी पूजन करून गावातील ज्येष्ठ नागरिक नामदेव यशवंत धनगर यांच्या हस्ते श्रीफळ फोडून पालखीची सुरुवात झाली. सर्व बाल वारकऱ्यांनी जल्लोषात आणि उत्साहात विठू नामाचा गजर केला. ढोल ताशाच्या गजरात दिंडीला सुरुवात झाली. यावेळी महाविद्यालयाचे ढोल पथक आणि लेझीम पथक यांचाही सहभाग दिंडीत होता. दिंडी मार्गात ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे या सोहळ्याला प्रतिसाद देऊन दिंडीचे पूजन केले. इयत्ता आठवीच्या विद्यार्थिनी कु .धनश्री पाटील आणि कु.डिंपल कोळी यांनी केलेली श्री विठ्ठलाची वेशभूषा विशेष आकर्षणाची ठरली.
दिंडी मार्गात याच विठ्ठल रुक्मिणीचे सर्व ग्रामस्थांनी दर्शन घेतले. या विशेष आकर्षणाला आव्हाने गावातील सुनील गोपाल चौधरी काशिनाथ भिका पाटील.
मंगल नारायण पाटील,विलास चिंतामण चौधरी यांच्या भजनी मंडळाची साथ मिळाली.भगवान नामदेव पाटील यांच्यातर्फे बाल वारकऱ्यांना लाडू वाटप करण्यात आले.यानंतर विठ्ठल मंदिरात आरती करून या दिंडीचा शेवट करण्यात आला.विठ्ठल मंदिरात ईश्वर पाटील, राजेंद्र यादव सपकाळे यांच्यातर्फे फराळ विद्यार्थ्यांना देण्यात आले. यानंतर महाविद्यालयाचे उपशिक्षक शुभम सोनार यांनी सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांचे मिळालेल्या सहकार्याबद्दल आभार मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यालयाच्या सर्व समिती तसेच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.
Discussion about this post