१३६ इन्फंट्री बटालियन (टीए) इको महार बटालियनमध्ये पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय (भारत सरकार), वन विभागातील माजी सैनिक व माजी महिला कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी विशेष भरती मेळावा आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा १६ ते २० मार्चदरम्यान एआरओ ग्राउंड, छावणी येथे होणार आहे.
भरती प्रक्रिया मोफत असून अधिक माहितीसाठी ९१६८१६८१३६ या क्रमांकावर संपर्क साधावा. पात्र उमेदवारांनी भरती प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन लेफ्टनंट कर्नल डी. के. सिंग यांनी केले आहे.
पात्रता अटी
माजी सैनिक किंवा माजी महिला कर्मचारी (वन विभाग/पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालय, भारत सरकार)
निवृत्ती/डिस्चार्जनंतर ५ वर्षांच्या आत अर्ज करणे आवश्यक
वैद्यकीय श्रेणी ‘शेप-१’, चारित्र्य उत्कृष्ट व आदर्श
कोणत्याही दिवाणी किंवा फौजदारी प्रकरणात सहभाग नसावा
पदांची माहिती
सोल्जर (जनरल ड्यूटी) – ४३ जागा (फक्त महाराष्ट्र)
ट्रेड्समन (ऑल इंडिया)
सोल्जर क्लर्क (जीडी) – ६
हेअर ड्रेसर – १, मेस कीपर – १, स्टेवर्ड – १, हाऊस कीपर – १
आवश्यक कागदपत्रे
पेन्शन पेमेंट ऑर्डर
डिस्चार्ज बुक
ईएसएम ओळखपत्र
अधिवास प्रमाणपत्र
आधार कार्ड
आठ पासपोर्ट आकाराचे फोटो
शारीरिक निकष
उंची: माजी सैनिक १६० से.मी. (गोरखा/गढवाली/आसामींसाठी १५२ से.मी.), महिला १५० से.मी.
वजन: माजी सैनिक किमान ५० कि.ग्रॅ., महिला ४२ कि.ग्रॅ.
छाती: किमान ८२ से.मी. (५ से.मी. फुगवटा आवश्यक), महिलांनाही ५ से.मी. फुगवटा
सेवा अटी
प्रारंभी २ वर्षांसाठी नियुक्ती; कामगिरीनुसार दरवर्षी मुदतवाढ
माजी सैनिकांना ५० वर्षांपर्यंत सेवा देता येईल
नियुक्त व्यक्तींची कोणत्याही प्रकल्पस्थळी बदली होऊ शकते
अपात्र ठरल्यास सेवामुक्तीची तरतूद















Discussion about this post