जळगाव । जनतेची गाऱ्हाणी व तक्रारी सोडविण्यासाठी दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरावर लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते.
भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 चा कार्यक्रम जाहिर केला आहे. त्यानुसार 16 मार्च, 2024 पासून देशभर निवडणूक आचारसंहिता लागू झालेली आहे. आचारसंहिता कालावधीत लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येवू नये असे निर्देश आहेत. त्यामुळे एप्रिल महिन्यात पहिल्या सोमवारी (01 एप्रिल, 2024) होणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. असे निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
Discussion about this post